Ongoing Programs and Research : PRAYAS PMTCT Program | Adolescent HIV Program | Cervical Cancer Screening and Prevention Services | mMITRA PROJECT | Youth in Transition


The individual efforts of Dr. Vinay and Dr. Sanjeevani Kulkarni around the issue of HIV/AIDS started in 1986. Prayas Health Group was formally launched in 1994 as an organization working in the field of HIV/AIDS. We work with children, adolescents as well as adults including pregnant women with HIV/AIDS belonging to all strata of society. The first HIV-infected person was treated at our clinic in 1989. We have been witness to the history and evolution of the HIV epidemic in India since beginning. As the epidemic unfolded, activities like awareness-building, interventions for prevention, research, advocacy, and training were initiated to address various aspects of HIV. 

We believe that if equipped with adequate information, sound analysis and necessary skills, even disadvantaged sections of society can tackle their problems and shape their own future.

With an aim to provide comprehensive care, counseling, and treatment under one roof, Prayas Health Group has an in-house clinic (Amrita Clinic), a counseling center, a laboratory and ART services. We also have an information center, a research unit, and intervention team. Developing creative and reader-friendly educational material has been strength of Prayas. Prayas means determined action in a defined direction – and it is our unwavering resolve to do the same! 

 

 UPCOMING EVENT

एचआयव्ही आणि लग्न ...

Join us for a webinar on Jan 10, 2019 at 3:00 PM IST.

 

Register now!

  प्रिय साथी,

      सप्रेम नमस्कार,

प्रयास आरोग्य गटातर्फे तीन राज्यव्यापी वेबिनारांचे आयोजन केले जात आहे, हे आपणास माहीतच आहे. वेबिनार म्हणजेच प्रत्यक्ष न भेटता, इंटरनेटच्या मदतीने होणारा ऑनलाइन सेमिनार आणि चर्चा. याआधी झालेल्या दोन वेबिनारांमध्ये एचआयव्ही आटोक्यात आणताना : नव्या वाटा, नव्या दिशा  आणि ‘एचआयव्ही आणि कायदा यावर मांडणी केलेली होती.

यानंतरचा तिसरा वेबिनार हा ‘लग्न आणि एचआयव्ही’ या विषयावर आयोजलेला आहे, त्यावर डॉ.  संजीवनी कुलकर्णी मांडणी करतील.

डॉ संजीवनी कुलकर्णी गेली पंचवीस वर्षे पालकत्व, लैंगिकता शिक्षण, एचआयव्ही  ह्या विषयांवर वैचारिक मांडणी करत आहेत. गेली आठ वर्षे एचआयव्हीसह जगणार्‍या किशोरवयीन आणि नवतरुणांच्या कार्यशाळा आयोजित करत आहेत. त्या अनुभवांमधूनच लग्न व एचआयव्ही या विषयांवर विशेष कार्यशाळाही प्रयास आरोग्य गटाने आयोजित केल्या आहेत.  

हा वेबिनार येत्या गुरुवारी तारीख१० जानेवारी २०१९ रोजी : दुपारी ३ ते ४ या वेळेत असेल.

वेबिनार संवाद इतर दोन वेबीनारांप्रमाणेच मराठीत असेल.

 ह्या वेबिनारमध्ये एचआयव्हीसंदर्भात जबाबदारी घेणारे सर्व, एचआयव्ही या विषयात काम करणाऱ्या संस्था, एचआयव्हीसह जगणारे घरी राहणारे तसेच संस्थेत राहणारे तरुण-तरुणी  सहभाग घेऊ शकतील. तरी या सर्व लोकांपर्यंत ह्या वेबिनारची माहिती पोहचविण्यात आपली मदत मिळावी अशी विनंती.     

वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी -

1.  Register now येथे जाऊन नाव नोंदवावे. नाव नोंदविताना तुमचे नाव आणि आडनाव तसेच तुमचा इमेल आयडी यांचा तपशील भरावा.

2.  त्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशनची एक इमेल येईल.

3.   कन्फर्मेशनच्या इमेलमध्येच वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी लिंक दिलेली असेल. त्यावर क्लिक करून तुम्ही वेबिनार मध्ये ठरलेल्या तारखेला व वेळेला सहभागी होऊ शकता.

4. वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे कम्प्युटर नसेल तरीही मोबाईलवरूनही तुम्ही सहभागी होऊ शकता.  मात्र तुमचा मोबाईल इंटरनेट सुविधा असणारा असावा.

5. मोबाईल वापरून वेबिनारमध्ये सहभागी व्हायचे असल्यास ‘गो-टू-वेबिनार’ असे अॅपलीकेशन तुमच्या मोबाईलमध्ये आधीच डाउनलोड करून ठेवा. हे अॅपलीकेशन डाउनलोड करण्यासाठीची लिंक तुम्हालाJoin webinar ह्या पर्यायावर क्लिक केल्यावर दिसू शकेल.

6.   आपल्याकडे कम्प्युटर, इंटरनेट सुविधा तसेच स्पीकरची सोय असल्यास अधिक लोकांसाठी वेबिनार ऐकण्याची सोय करता येते.

7. चर्चेमध्ये सहभागी झाल्यावर काही प्रश्न असतील तर ते तुम्हाला  वेबिनार दरम्यान टाईप करून पाठविता येतील. आपण मराठीमध्येही टाईप करून प्रश्न पाठवू शकता.

एचआयव्हीत अधिक अभ्यासपूर्ण पद्धतीने काम करता यावे म्हणून आयोजलेल्या ह्या वेबिनारमध्ये आपण  उत्साहाने सहभागी व्हावे अशी आपल्याला आमची विनंती आहे.

 

प्रयास आरोग्य गट,

पुणे

 

 

Prayas-Amrita Clinic, Athawale Corner, Karve Road, Deccan Gymkhana, Pune - 411 004, Maharashtra, India.
Tel.: +91-20-25441230/65615726 Tel./Fax: +91+20-25420337 E-mail: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.